Lockdown : ”राज्यात येत्या काही तासांत संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा” : अस्लम शेख

मुंबई : राज्यात सध्या करोनाने भयंकर तांडव सुरु केला असून, हि परिस्थिती हाताळणे आता आवाक्या बाहेर गेले आहे. या अनुषंगाने राज्य सरकारने 30 एप्रिल पर्यंत राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत, तरीही अजून परिस्थिती आटोक्यात नाही आलेली.

दरम्यान, येत्या काही तासांमध्ये संपूर्ण लॉकडाऊन लावावा लागेल”, अशी महत्त्वाची माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर अस्लम शेख यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. “राज्यात आपण कठोर निर्बंध आणले. पण तरीही केसेस कमी होत नाहीयेत. ऑक्सिजनचा तुटवडा दिसत आहे. बेड मिळत नाहीयेत.

आज बरीच चर्चा झाल्यानंतर येत्या काही तासांत महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाऊन आणावा लागेल. आपण निर्बंध कठोर करत गेलो. ऑक्सिजनचा तुटवडा आणि वाढती रुग्णसंख्या पाहाता अखेर हा निर्णय घ्यावा लागला आहे. गाईडलाईन्स तयार करून तुम्हाला दिल्या जातील”, असं देखील अस्लम शेख यावेळी म्हणाले.

ताज्य बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या फेसबुक पेज  आणि टि्वटरवर आम्हाला फॉलो करा… 

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeE


 

You May Also Like