मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा निनावी फोन, शोध सुरू

मुंबई : मंत्रालयात बॉम्ब ठेवण्याच्या धमकीमुळे एकच गोंधळ उडाला आहे. एका व्यक्तीने निनावी फोन करून मंत्रालयात बॉम्ब असल्याची माहिती दिली होती. त्यामुळे बॉम्बनाशक पथक बॉम्बचा शोध घेत आहे.

दरम्याण, आज दुपारच्या सुमारास मंत्रालय परिसरात बॉम्ब ठेवण्यात आल्याचा निनावी फोन आला होता. मंत्रालयातील कंट्रोल रुमला एका अज्ञात व्यक्तीने फोन करून ही धमकी दिली. त्यामुळे तातडीने यंत्रणा जागी झाली आणि सर्वत्र शोधा सुरू झाला.

मंत्रालयात बॉम्बशोधक पथक दाखल झाले आहे. मंत्रालयातील संपूर्ण परिसरात बॉम्ब आहे का याचा तपास सुरू आहे. खबरदारी म्हणून सर्व गेट बंद करण्यात आले आहे. सुदैवाने आज रविवार असल्यामुळे मंत्रालयातील सर्व कर्मचार्‍यांना सुट्टी आहे. तसंच कोरोनाच्या नियामवलीमुळे सुद्धा कर्मचार्‍यांची कमीच उपस्थिती आहे.

You May Also Like