परभणी । दहशतवाद विरोधी पथकाची मोठी कारवाई केली आहे. परभणी जिल्ह्यात जिलेटीन कांड्या आणि डिटोनेटरचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. दहशतवाद विरोधी पथकाने 9 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
परभणी जिल्ह्यात दहशतवादी विरोधी पथकाने जिंतूर मंठा रोडवरील डोनवाडा भागातून मोठ्या प्रमाणात स्फोटक पदार्थ असलेल्या जिलेटीन कांड्या आणि डिटोनेटर जप्त केले आहेत. जिंतूर तालुक्यातील डोनवाडा भागात आरोपी राजेश दोंडवय ,दिलीप पदराम आणि मदन घुले यांनी डोनवाडा भागात जिलेटीन कांड्या आणि डिटोनेटरचा साठा करुन ठेवला होता.
परभणीच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) बेकायदेशीररित्या विनापरवाना असुरक्षित अवैधरित्या जिवीतास धोका होईल, असे स्फोटक पदार्थ जिलेटीन नळ कांड्या, डिटोनेटर काँम्प्रेसर मशिन आणि ब्यालास्टीगचे ट्रॅक्टर चालवत बाळगलेल्या स्थितीत मिळून आले. या आरोपितांकडून 228 जिलेटीन कांड्या आणि 108 डिटोनेटर 2 ब्लास्टिंग ट्रॅक्टर आणि 2 कॉम्प्रेसर मशीन असा 9 लाख 6 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या तिन्ही आरोपितांविरुद्ध जिंतुर येथे स्फोटक पदार्थ अधिनियम 1908 आणि मोटार वाहन नियम कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.