करोनावर उपचारासाठी ‘अँटीबॉडी कॉकटेल’ ठरणार रामबाण उपाय

भारतातही होणार उपलब्ध, एका डोसची किंमत 59,750 रुपये
नवी दिल्ली : भारतात करोनाच्या दुसर्‍या लाटेने थैमान घातले आहे. यातच जगातील अग्रगण्य औषध निर्माता कंपनी ठेलहशने तयार केलेली ’अँटीबॉडी कॉकटेल’ आता भारतातही उपलब्ध होईल. ठेलहश एक स्विस कंपनी असून ती भारतात प्रसिद्ध फार्मा कंपनी सिप्लाच्या माध्यमाने हे औषध लोकांपर्यंत पोहोचविणार असल्याचं सांगण्यात येतेयं.

या औषधात उरीळीर्ळींळारल आणि खावर्शींळारल नावाच्या दोन औषधांचे मिश्रण आहे. ही दोन्ही अँटीबॉडी औषधं व्हायरसवरील उपचारावर चांगल्या प्रकारे प्रभावी आहेत. विशेषतः हलक्या आणि मध्यम स्वरुपाचे संक्रमण असलेल्या रुग्णांसाठी हे औषध अत्यंत प्रभावी असल्याचे सांगितले जात आहे. सेंट्रल ड्रग्स स्ॅटन्डर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने देशातील करोना स्थितीच्या पार्श्वभूमीवर याच महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच या औषधाच्या वापराला मंजुरी दिली. तेव्हापासूनच हे औषध भारतीय नागरिकांसाठी लवकरच उपलब्ध होईल, असा अंदाज लावला जात होता. यूरोप आणि अमेरिकेत या औषधाला आधीच मंजुरी देण्यात आली आहे.

सदरील औषध सर्वसामान्यपणे लॅबमध्ये तयार करण्यात आलेले प्रोटीन आहेत. हे प्रोटीन व्हायरसचा सामना करण्यासाठी इम्यून सिस्टमच्या क्षमतेची कॉपी करतात. यामुळे व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. महत्वाचे म्हणजे, या औषधाचा वापर 12 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या मुलांवरही केला जाऊ शकतो. या औषधाची किंमत सध्या फार अधिक असेल. प्रत्येक रुग्णासाठी या औषधाच्या डोसची किंमत 59,750 रुपए एवढी असणार आहे.

You May Also Like