पुणे जिल्ह्यात अँटिजेन कीट दोन दिवसात उपलब्ध होणार

पुणे : जिल्ह्यात काही दिवसांपासून अँटीजन कीटचा तुटवडा असल्यामुळे या चाचण्या बंद होत्या. गेल्या आठवड्यापासून मोठ्या प्रमाणात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. अशा स्थितीत नवे रूग्ण शोधण्यासाठी अँटिजेन चाचण्या आणि आरटीपीसीआर चाचण्या केल्या जात होत्या. मात्र,  परिणामी आरटीपीसीआर चाचण्या वाढवण्याच्या सूचना केल्या होत्या. अँटिजेन किटचा तुटवडा भरून काढण्यासाठी नव्या पुरवठादाराकडे जवळपास १ लाख ९० हजार अँटिजेन कीटची मागणी केली असून येत्या दोन ते दिवसांत या किटचा पुरवठा जिल्ह्याला होईल, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक अशोक नांदापुरकर यांनी दिली.

जिल्ह्यात वाढत्या कोरानो बाधितांच्या संख्येमुळे अँटीजन व आरटीपीसीआर चाचण्या सुरु होत्या परंतु अँटिजेन किट संपल्याने अँटीजन चाचण्या बंद झाल्या. त्यामुळे नव्या अँटिजेन किटची मागणी आरोग्य विभागामार्फत करण्यात आली होती.

मात्र, ‘हाफकिन’ संस्थेने या किटचे दर ५६ रूपये ठरवून दिली असतांनाही कीट उपलब्ध नसल्याने या किटच्या किमंती ५६ वरून १२३ रूपयांपर्यंत गेली होती. यामुळे जुन्या पुरवठा दाराने ५६ रूपयांने किट पुरवण्यास नकार दिला. यामुळे नव्या दराने अँटिजन कीट खरेदीसाटी साेमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. यात हाफकिन संस्थेशी चर्चा करून नवे दर निश्चित करून नव्या पुरठा दाराकडून किट खरेदी केले जाईल असे ठरले. त्यानुसार लवकरच नव्या पुरवठा दाराला १ लाख ९० हजार डोसची ऑर्डर दिली जाणार आहे, या तील १० हजार किट दोन दिवसांत जिल्ह्याला मिळेल असे, नांदापुरकर म्हणाले.

You May Also Like