एपीआय रियाझुद्दीन काझी पोलीस सेवेतून बडतर्फ

मुंबई : मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेरील रस्त्यालगत स्फोटकांनी भरलेली कार व व्यापारी मनसुख हिरन यांच्या हत्या प्रकरणात एनआयएनं सचिन वाझे यांना अटक केली होती. सचिन वाझे यांच्या चौकशीनंतर या प्रकरणात अनेक धक्कादायक नावही समोर येत आहेत. त्याचवेळी काझी यांचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे समोर आले होते. त्यानंतर एनआयएनं काझी यांना अटक केली होती. काझी यांच्या अटकेनंतर त्यांच्यावर गंभीर स्वरुपाच्या गुन्हाचा ठपका ठेवत पोलीस सेवेतून निलंबित करण्यात आलं होतं.

काझी यांच्या निलंबनानंतर त्यांच्यावर अखेर पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आलं आहे. मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 311 (2) (बी) अंतर्गत मिळालेल्या विशेषाधिकाराचा वापर करून शुक्रवारी या कारवाईबाबतचे आदेश जारी केले. याआधी 11 मे रोजी वाझे यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.

सह पोलिस निरीक्षक रियाझुद्दीन काझी हे 2010च्या तुकडीतील निरीक्षक आहेत. उप निरीक्षकानंतर सह पोलिस निरीक्षकपदी बढती मिळताच त्यांची अलिकडेच बदली गुन्हे गुप्तवार्ता विभागात (सीआययू) झाली. तेव्हापासून ते सचिन वाझे यांच्या खास विश्वासातले ठरले होते. त्यामुळेच हे गुन्हे करण्यात वाझे यांनी त्यांनादेखील सहभागी करून घेतले. पण आता त्यांना अटक झाल्याने मोठ्या प्रकरणाचा फेरा त्यांच्या मागे लागला आहे.

You May Also Like