वडिलांच्या दुसर्‍या लग्नावर पहिल्यांदा बोलला अर्जुन कपूर…

मुंबई : बॉलिवूड दिग्दर्शक-निर्माता बोनी कपूर यांनी 1983 मध्ये मोना शौरीसोबत लग्नगाठ बांधली. लग्नानंतर दोनच वर्षांत बोनी व मोना यांचा पहिला मुलगा अर्जुनचा जन्म झाला. नंतर पाच वर्षांनी अंशुला जन्मली. पण अर्जुन कपूर उणापुरा 11 वर्षांचा झाला असेल नसेल तेव्हा त्याच्या आईबाबाचा घटस्फोट झाला. मोना व बोनी यांचा संसार मोडला आणि त्याचवर्षी बोनी यांनी सुपरस्टार श्रीदेवींसोबत लग्नगाठ बांधली. आज अर्जुनची आई या जगात नाही. परंतु आईच्या आठवणीशिवाय अर्जुनचा एक दिवसही जात नाही. अर्जुनने कधीच श्रीदेवींना आई म्हणून स्वीकारले नव्हते. पण श्रीदेवींच्या मृत्यूनंतर अर्जुन वडिलांच्या आणि जान्हवी व खुशी या सावत्र बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभा झाला.

ते ठीक होते, असे म्हणणार नाही़…
प्रेम ही भावनाच मुळात कॉम्प्लिकेटेड आहे़ एखाद्या व्यक्तिवर प्रेम करत असतानाच तुम्ही दुस-या व्यक्तिच्याही प्रेमात पडू शकता. हे शक्य आहे. प्रेमात असताना लोक अनेक टप्प्यातून जातात. माझ्या वडिलांनी जे केले ते योग्य होते, असे मी म्हणणार नाही. असे सांगितले.

माझ्या आईने दिलेले संस्कार नेहमी माझ्यासोबत असतील. काहीही होवो, कशीही परिस्थिती येवो पण नेहमी वडिलांसोबत राहा, असे मला आईने सांगितले होते. पापांनी जो काही निर्णय घेतला, तो प्रेमात घेतला, असे तिने मला सांगितले होते. मी आजही वडिलांचा आदर करतो. त्यांना दुस-यांदा प्रेम झाले, त्या प्रेमाचा मी आदर करतो. पण प्रेम मुळातच खूप जटील गोष्ट आहे. प्रेम एकदाच होतं, असं म्हणणं आज मूर्खपणा ठरेल, असेही तो म्हणाला.

You May Also Like