फडणवीस यांनी नाशिकसाठी दिलेला शब्द केला खरा : महापौर कुलकर्णी

नाशिक :नाशिकमध्ये ऑक्सिजनचा अतिशय तुटवडा असताना माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते यांनी तातडीने येथे भेट देऊन हॉस्पिटलची पाहणी करून आढावा घेतला. यावेळी त्यांनी शहराला ऑक्सिजन टँकर मिळवून मिळवून देऊ असा दिलेला शब्द खरा केला असल्याचे स्पष्ट झाले आहे. काल नाशिकला ऑक्सीजन टँकर मिळाल्याने महापौर सतीश कुलकर्णी यांनी फडणवीस यांचे आभार मानले आहे. यावेळी ऑक्सिजन टँकरचे पूजन करून चालकाचा सत्कार करण्यात आला.

काल सकाळी साडेसहा वाजता या ऑक्सिजन टँकरचे रुग्णालयात आगमन झाले. शहरामध्ये ऑक्सिजन अभावी रुग्ण दगावत असल्याने विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी करून प्रशासनालाही सूचना दिल्या होत्या. तसेच यावेळी त्यांनी आढावा घेत नाशिकला महिन्याला आठ ऑक्सिजन टॅंकर मिळण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले होते. काल या आश्वासनाची पूर्तता झाली असल्याचे दिसून आले. नाशिकला आठवड्यात दोन व महिन्याला आठ अशी ऑक्सिजन टँकरची व्यवस्था फडणवीस यांनी करून दिली आहे.

तसेच नाशिक करोनाच्या बिकट परिस्थितीत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रेल्वेद्वारे ऑक्सिजन टँकर पाठवत आहे. तर कालपासून हे जादाचे टँकर मिळाल्यामुळे शासकीय व खाजगी रुग्णालयात ऑक्सिजन बेड उपलब्धता होणार असल्याने नाशिककर जनतेसाठी दिलासादायक ठरले आहे. अशी प्रतिक्रिया महापौर सतीश कुलकर्णी यांनी व्यक्त केली. तसेच माजी पालकमंत्री गिरीश महाजन, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री जयकुमार रावल यांनीही नाशिकसाठी ऑक्सिजन मिळण्याकरिता प्रयत्न चालवले होते. त्यांचेही आभार महापौरांनी यावेळी मानले.

काल सकाळी साडेसहा वाजता नाशिकमध्ये टँकर आला असता आनंद व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी आ. सीमा हिरे, स्थायी समिती सभापती गणेश गीते, भाजप महानगरप्रमुख गिरीश पालवे, सभागृह नेता सतिश सोनवणे, गटनेता जगदीश पाटील, भाजपा शहर सरचिटणीस प्रशांत जाधव, महेश हिरे आदी उपस्थित होते.

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeE

You May Also Like