आसाराम बापूंच्या तब्येतीत बिघाड, ऑक्सिजन 93 च्या खाली

जयपूर : अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणातील आरोपी आसाराम बुप सध्या राजस्थानमधील जोधपुर सेंट्रल जेलमध्ये शिक्षा भोगत आहेत. मात्र काहीच दिवसांपुर्वी आसाराम बापु यांना करोनाची लक्षणे जाणवली होती. तर रविवारी पुन्हा एकदा त्याचा ऑक्सिजन लेवल कमी झाली. त्यानंतर तुरुंग व्यवस्थापनाकडून त्याला पुन्हा एकदा रूग्णालयात मध्ये घेऊन जाण्याची तयारी सुरू केली. मात्र आसारामने रुग्णालयात जाण्यास नकार दिला. त्यानंतर मात्र आयुर्वेद यूनिवर्सिटीतून एका डॉक्टरला बोलावण्यात आलं आणि आता तुरुंगातच त्याला ऑक्सिजन दिलं जात आहे.

करोनातून बरे झाल्यानंतर आसारामला रूग्णालयातुन मधून डिस्चार्ज देण्यात आला होता. जोधपुर सेंट्रल जेलमध्ये रविवारी सकाळी त्याची ऑक्सिजन लेवल 92 पर्यंत घटली होती. त्यानंतर तुरुंगात त्याला ऑक्सिजनवर ठेवण्यात आलं. जेव्हा तुरुंग प्रशासनाने त्याला रुग्णालयात हलविण्याबद्दल सांगितलं तेव्हा त्याने यास विरोध केला आणि रुग्णालयातच आयुर्वेदिक उपचार देण्याची मागणी केली. त्यानंतर जेल प्रशासनाने करवड येथील आयुर्वेदिक विद्यापीठातून डॉक्टरांना बोलावलं व आसारामची तपासणी केल्यानंतर काही औषधं दिली.

You May Also Like