भारतीय संघात होणार अश्विनचं पुनरागमन! कुणाला मिळणार डच्चू

मुंबई । भारतीय संघ पाच टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये इंग्लंडवर 1-0 नं आघाडी घेतली आहे. पहिली टेस्ट पावसामुळे ड्रॉ झाली होती. त्यानंतर भारतीय टीमनं लॉर्ड्सवर 151 रननं विजय मिळवला. आता तिसरी टेस्ट 25 ऑगस्टपासून होणार आहे.  भारतीय संघाचा  प्रमुख स्पिनर आर. अश्विनला अद्याप एकाही टेस्टमध्ये संधी मिळालेली नाही. त्यामुळे विराटला प्रश्न विचारले जात आहेत.

 

विराटच्या जागी टीम मॅनेजमेंटनं रविंद्र जडेजाला संधी दिली आहे. जडेजानं या मालिकेत चांगली बॅटिंग केली असली तरी बॉलिंगनं निराश केलं आहे. त्यानं  44 ओव्हर बॉलिंग केली. पण त्याला एकही विकेट मिळालेली नाही. लॉर्ड्स टेस्टमध्ये भारतीय बॉलर्सनी विजय मिळवून दिला. तिथंही जडेजा संघर्ष करत होता. त्यामुळे लीडस टेस्टमध्ये अश्विनला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.

रविंद्र जडेजानं इंग्लंड दौऱ्यात आतापर्यंत फक्त 2 विकेट घेतल्या आहेत. तर आर. अश्विननं न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये 4 विकेट्स घेतल्या होत्या. तसंच सरेकडून कौंटी मॅच खेळताना 7 विकेट्स घेत त्याचा फॉर्म सिद्ध केला होता. त्यामुळे जडेजाच्या जागी अनुभवी अश्विनला टीम इंडियामध्ये संधी मिळू शकते.

You May Also Like