आसाम-मिझोराम सीमा संघर्ष; गोळीबारात सहा पोलिसांचा मृत्यू

गुवाहाटी ।  आसाम आणि मिझोराम यांच्यातील सीमा वाद तापला असून यात झालेल्या गोळीबारात आसामच्या ६ पोलिसांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सर्मा यांनी ट्विट करून याबद्दलची माहिती दिली आहे. यामुळे सीमा प्रश्न आणखी चिघळण्याची शक्यता आहे. दोन्ही मुख्यमंत्र्यांनी एकमेकांवर आरोप केले आहेत.

 

‘आसाम-मिझोरामच्या सीमेवर आपल्या सीमेचं रक्षण करत असताना आसाम पोलीस दलाचे ६ शूर पोलीस शहीद झाले आहेत, हे सांगताना मला अतिशय दु:ख होतंय. माझ्या सहवेदना त्यांच्या संतप्त कुटुंबियांच्या सोबत आहेत,’ असं मुख्यमंत्री हिमंता बिस्व सर्मा यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. दरम्यान  सीमा प्रश्न आणखी हिंसक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

 

You May Also Like