विधानसभा निवडणुकीसाठी भुसावळमधून ५५ इच्छुकांनी नेले ५६ अर्ज

भुसावळ: विधानसभा निवडणुकीची शुक्रवारी अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर प्रत्यक्षात उमेदवारी अर्ज भरण्यासह अर्ज वाटप करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी २७ इच्छुकांनी २८ उमेदवारी अर्ज नेल्यानंतर रविवारच्या सुटीनंतर सोमवारी पुन्हा २८ इच्छूकांनी अर्ज नेल्यानंतर आतापर्यंत ५५  इच्छूकांनी ५६ अर्ज नेल्याची माहिती सूत्रांनी दिली. काँग्रेस-भाजप सेनेसह अपक्षांनी अर्ज नेण्यासाठी भाऊगर्दी केली असून ४ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे तर भुसावळ येथे आजअखेर एकही अर्ज दाखल झालेला नाही. भुसावळ भाजपाचे विद्यमान आमदार संजय वामन सावकारे यांनी देखील सोमवारी उमेदवारी अर्ज नेल्याचे सूत्रांनी सांगितले.

सोमवारी यांनी नेले अर्ज सोमवारी भाजपाचे विद्यमान आमदार संजय वामन सावकारेअपक्ष राजेंद्र केशव सपकाळेमनीषा महेंद्र सपकाळेसाहेबराव केदारेनिलेश जय सपकाळेछाया विलास सपकाळेअपक्ष विनोद माधव सोनवणेकिरण प्रल्हाद वानखेडेअ‍ॅड. जगदीश भालेरावसचिन कुंदन वानखेडेमनेाहर सोमा अहिरेरवींद्र बाबूराव खरातवंदना कैलास घुलेसागर सुधाकर बहिरुणे, आरपीआयतर्फे रमेश दगडू मकासरेराष्ट्रवादीतर्फे जगन्नाथ देवराम सोनवणे तसेच पुष्पा जगन्नाथ सोनवणेवंचित बहुजन आघाडीतर्फे विलास धोंडू सपकाळे व विनोद अशोक सोनवणे तसेच दिनेश रामदास ईखारेमहेंद्र नारायण शेजवळकरमनसेतर्फे शैलेश प्रभाकर बोदडेशिवसेनेतर्फे गोकुळ नामदेव बाविस्करभाजपातर्फे यमुना दगडू रोटे,काँग्रेसतर्फे संजय पंडित ब्राह्मणे व विवेक भीमराव नरवाडे तसेच बसपातर्फे राकेश साहेबराव वाकडे आदी २८ इच्छूकांनी अर्ज नेले आहेत.

You May Also Like

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.