मेशीजवळ एक रिक्षासह बस विहिरीत कोसळली; १० ते ११ जणांचा मृत्यू

नाशिक : मालेगाव कळवण रस्त्यावरील मेशी फाटा नजीक रस्त्याच्या कडेला असलेल्या एका विहिरीत प्रवाशांनी भरलेली बस पडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातात २० जण दगावल्याची शक्यता असून ३० ते ४० प्रवासी जखमी झाले आहेत.

मालेगाव येथील येसगाव गावातील मुस्लिम कुटुंबातील आठ जण मुलगी पाहण्यासाठी देवळ्याला गेले होते. मुलगी बघून आपे रिक्षाने परत येत असताना अपघात झाला. रिक्षात कुटुंबातील सर्वच्या सर्व आठ जणांचा मृत्यू झाला असून मुलगी बघण्यासाठी गेलेल्या कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. यात चालकाचाही मृत्यू झाला असून चालकाचे वय अवघे २५ आहे. येसगावातीलच ९ जणांचा मृत्यू झाल्यामुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

मंगळवारी मालेगाव देवळा रस्त्यावर झालेल्या बस व हॅप्पी रिक्षा अपघातात मालेगाव तालुक्यातील येसगाव येथील एपे रिक्षा ( एम एच 15 डीसी 4233) चालक नाना शांतीलाल सूर्यवंशी ( वय 25, रा. येसगाव तालुका मालेगाव) हा गावातील रशीद अंजुम अन्सारी ( वय 25) यांच्या कुटुंबातील आठ ते नऊ सदस्यांना रशीद साठी मुलगी पाहण्यासाठी सकाळी देवळा येथे येऊन गेले होते. देवळा इथून मुलगी पाहण्याचा कार्यक्रम आटपून चालक नाना सूर्यवंशी व रशीद अंजुन अन्सारी यांचे कुटुंबीय मालेगाव कडे परतत असताना मालेगाव कळवणच्या दिशेने जाणारी धुळे कळवण बस बस ( एम एच 06 एस 8428) व ॲपे रिक्षा यांच्या मिशी फाटा येथील हॉटेल देश-विदेश नजीक समोरासमोर भीषण धडक झाली. रस्त्यालगत असलेल्या विहिरीत अपघात झालेली एपे रिक्षा व बस कोसळली. यात रिक्षाचालक नाना शांतीलाल सूर्यवंशी व रशीद अन्सारी यांच्या कुटुंबातील आठ ते नऊ सदस्य मृत झाले आहे. मृतांमध्ये येसगाव करंजगव्हाण सटाणा येथील लोकांचा समावेश आहे. या भीषण अपघातामुळे रशीद याचा विवाह होण्यापूर्वीच संपूर्ण अन्सारी कुटुंबावर काळाने झडप घातल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

दरम्यान, रशिद अजीम मंसूरी यास देवळा येथे कुटुंब मुलगी पहावयास गेले होते. रशिद येसगाव येथे होता तो आधी मुलगी पाहून आला असल्यामुळे तो बचावला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा…

You May Also Like

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!