बॉक्स ऑफिसवर अनेकदा दोन मोठ्या चित्रपटांची टक्कर पाहायला मिळते

मुंबई – बॉक्स ऑफिसवर अनेकदा दोन मोठ्या चित्रपटांची टक्कर पाहायला मिळते. यामध्ये एकदा चित्रपटाचा फायदा होतो. तर दुसर्‍या चित्रपटाला तोटा होतो. असाच एकदा किस्सा सनी देओल आणि आमिर खान यांच्यासोबत घडला आहे.

अनेकदा या दोघांच्या चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्कर झाली आहे. परंतु, सनी देओल आणि आमिर खानमधील एक गोष्ट तुमच्या लक्षात आली नसेल कि हे दोघेही एकमेकांशी बोलत नाही. ३१ वर्षांपासून सनी आणि आमिरमध्ये तणावाची परिस्थिती आहे.

जून१९९० साली सनी देओल आणि आमिर खान यांचे चित्रपट समोरासमोर आले होते. आमिर खानचा ‘दिल’ आणि सनी देओलचा ‘घायाल’ चित्रपट रिलीज झाले होते. परंतु, याची आमिरने घायलची रिलीज डेट पुढे घेण्यास सनी देओलला सांगितले होते.

मात्र, सनीने काहीच ऐकले नाही. दोन्हीही चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. आमिर आणि सनीला दोघांनाही फिल्मफेअरमध्ये बेस्ट ऍक्टरसाठी नॉमिनेशन मिळाले होते.

‘दिल’ हा चित्रपट हिट झाल्याने अवॉर्ड मिळण्याची पूर्ण आशा आमिर खानला होती. परंतु, सनी देओलला हा अवार्ड मिळाला. यामुळे आमिर खूप नाराज झाला. यानंतर आमिर खानने कोणत्याही अवॉर्ड फंक्शनमध्ये न जाण्याची शपथ घेतली. सोबतच फिल्मफेअरवर पक्षपात करण्याचा आरोपही केला होता.

१९९० साली अनेक वेळा फिल्मफेअरसाठी नॉमिनेशन भेटले. परंतु, आपल्या हट्टापुढे कोणाचेही ऐकले नाही. आजही आमिरने कोणत्याही अवॉर्ड फंक्शनला उपस्थिती लावली नाही.

आमिर खान आणि सनी देओल यांच्या चित्रपटात एकदा नाहीतर अनेकवेळा टक्कर झाली. दिल आणि घायलनंतर १९९६ मध्येही दोघांचे चित्रपट एकमेकांसमोर आले.

सनी देओलचा ‘घातक’ आणि आमिर खानचा ‘राजा हिंदुस्थानी’ या चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्कर झाली. यानंतरही २००० साली सनीचा ‘गदर’ आणि आमिरचा ‘लगान’ हे चित्रपटही स्क्रीनवर एकमेकांना भिडले होते.

दरम्यान, सनी देओल आणि आमिर खान ‘डर’ चित्रपटात एकत्र काम करणार होते. परंतु, नंतर आमिरने चित्रपटात काम करण्यास नकार दिला.

You May Also Like

error: Content is protected !!