भुसावळात शहरात मामा व मावशीकडे आलेल्या अल्पवयीन बालिकेवर अत्याचार

भुसावळ : शहरात मामा व मावशीकडे आलेल्या अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना 21 जून 2021 च्या सात महिन्यांपूर्वी घडली होती. या प्रकरणी दोघा आरोपींना बाजारपेठ पोलिसांनी अटक केल्यानंतर शुक्रवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

मामाने नात्यालाच फासला काळीमा
मध्यप्रदेशातील एका गावातील 16 वर्षीय बालिका शहरात मावशीकडे आली असता तिच्यावर मावसा संतोष लागीर गिरी (53) यांनी विनयभंग केला. ही बाब मावशीला सांगितल्यानंतर त्यांनीही दुर्लक्ष करीत पीडीतेला भाऊ (पीडीतेचा मामा) संतोष वामनराव भारती (34) यांच्याकडे पाठवले मात्र तेथे मामा भारती यांनीच बालिकेवर तब्बल सात महिने अत्याचार केले. पीडीतेने ही बाब कुणाला सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली. गुरुवारी पीडीतेने बाजारपेठ पोलीस ठाणे गाठून कैफियत मांडल्यानंतर संतोष लागीर गिरी (53), संतोष वामनराव भारती (34) व प्रमिला संतोष गिरी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. संतोष गिरी व संतोष भारती यांना अटक करण्यात आल्यानंतर शुक्रवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तपास निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक गणेश धुमाळ, सुभाष साबळे करीत आहेत.

You May Also Like

error: Content is protected !!