पोलीस आयुक्त कार्यालयासमोर महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न

नाशिक । युवा स्वाभिमान पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्ष राजलक्ष्मी पिल्ले यांनी त्यांच्या पतीसमवेत पोलीस आयुक्तालयापुढे अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.

 

 

दरम्यान, श्रमिक सेनेचे अजय बागुल यांच्या कडून झालेल्या मारहाणीबाबत पोलिसांकडून अद्यापही कुठलीही दखल घेतली नाही याचा निषेध म्हणून पिल्ले दाम्पत्याने आयुक्तालयापुढे आत्मदहनाचा प्रयत्न केला. अंबड पोलीस स्टेशन व इंदिरानगर पोलिस या ठिकाणी तक्रार अर्ज करून देखील न्याय मिळाला नाही म्हणून पोलीस आयुक्तालयासमोर राजलक्ष्मी पिल्ले व त्यांच्या पतीने अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

You May Also Like