औरंगाबाद : 15 दिवसांपूर्वीच कारागृहातून सुटलेल्या सराईत गुन्हेगाराची हॉटेल मधून ओढत रस्त्यावरच दगडाने ठेचून खून

औरंगाबाद : वर्चस्वाच्या लढाईत वर्षभरापूर्वी विरोधी गॅंगच्या सदस्यांची हत्या करून 15 दिवसांपूर्वीच कारागृहातून सुटलेल्या सराईत गुन्हेगाराची हॉटेल मधून ओढत रस्त्यावरच दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना.शुक्रवारी रात्री वाळूज औधोगिक वसाहतीत घडली.या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
संचारबंदीत पुन्हा हत्या! डोक्यात वार करून अज्ञात तरुणाचा खून,खळबळजनक ! घराजवळच माजी उपसरपंचाची हत्या?
दोन्ही पाय तोडुन गळा चिरला;तरुणाची निर्घृण हत्या…
वाळूज औधोगिक नगरीत पुन्हा टोळी युद्ध उफाळून आल्याचे चित्र दिसत आंहे. विशाल उर्फ मद्या किशोर फसाटे या सराईत गुन्हेगाराला हॉटेल मधून बाहेर ओढत दगडाने ठेचून शुक्रवारी रात्री हत्या करण्यात आली.

वाळूज परिसरात असलेल्या हॉटेल मृगणायणी मध्ये मयत विशाल उर्फ मद्या किशोर फासाटे बसला होता त्याला दोन आरोपीनी ओढत बाहेर आनले व दगडाने ठेचून हत्या केली.गेल्यावर्षी वडगावतील योगेश प्रधान खून प्रकरणातही विशाल चा सहभाग होता.वर्षभर कारागृहात राहिल्या नंतर 15 दिवसांपूर्वीच घरी आला होता.मयत हा सराईत गुन्हेगार असून त्यावर 7 ते 8 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे.योगेश प्रधान यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी जामिनावर सुटलेल्या विशाल फसाटे याचा मयत योगेश प्रधान या साथीदारांनी दगडाने ठेचून खून केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तविला जात आहे.या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलं आहे.

You May Also Like