CoronaVirus: ऑस्ट्रेलियानं भारतातून येणारी प्रवासी विमानं १५ मेपर्यंत केली रद्द!

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून भारतात रोज ३ लाखांहून जास्त नवे करोनाबाधित सापडत आहेत. देशातील एकूण रुग्णसंख्या १ कोटी ७६ लाख ३६ हजार ३०७ इतकी झाली आहे. तर २७७१ मृत्यूंसोबत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १ लाख ९७ हजार ८९४ वर पोहोचली आहे. दरम्यान, भारतात करोनाची वाढती रुग्णसंख्या पाहाता अनेक देशांनी भारतात येण्यापासून आणि भारतातून येण्यापासून त्यांच्या नागरिकांना बंदी घातली आहे.

या पार्श्वभूमीवर आता ऑस्ट्रेलियानं देखील कठोर निर्णय घेतला आहे. भारतातून ऑस्टेलियाला जाणारी सर्व प्रवासी विमानं रद्द करण्याचा निर्णय ऑस्ट्रेलिया सरकारने घेतला आहे. या आधी एअर इंडियानं ब्रिटनला जाणारी आणि येणारी विमानं रद्द केली आहेत. सध्या भारतात आयपीएलचा हंगाम सुरू असून ऑस्ट्रेलियातील अनेक खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि काही नागरिक देखील भारतात दाखल आहेत. ते देखील या निर्णयामुळे भारतात अडकून राहणार असल्यामुळे त्यांना आता १५ तारखेपर्यंत ऑस्ट्रेलियाला परत जाता येणार नाहीये.

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeE

You May Also Like