रेमडेसिविरचा अनावश्यक वापर टाळाः मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

मुंबईः गरज नसताना रेमडेसिविर दिल्यास त्याचे दुष्परिणाम होतात. अनावश्यक रेमडेसिविरचा वापर करू नये ही माझी विनंती आहे, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी डॉक्टर्स आणि कोविड सेंटर्सना केलेय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधलाय. त्यावेळी ते बोलत आहेत. रेमडेसिविरच्या दररोज 50 हजार इंजेक्शनची आवश्यकता आहेत. केंद्रानं सर्व स्वतःच्या हातात घेतलेलं आहे. आपल्याला सुरुवातीला केंद्रानं 43 हजार रेमडेसिविरची इंजेक्शन पुरवलीत. रोज 35 हजार रेमडेसिविरची इंजेक्शन मिळतात, असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलंय.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, आता अचनाक रेमडेसिविरची मागणी फार मोठ्याप्रमाणावर सुरू झाली आहे. आपल्याला रोजची सरासरी ५० हजार इंजेक्शनची आवश्यकता आहे. आपण आज किती मिळवत आहोत, तर ऑक्सिजन प्रमाणेच रेमडेसिविरचं वितरण हे केंद्राने आपल्या हातात घेतलेलं आहे. कारण, परिस्थती फारच वाईट आहे. प्रत्येक राज्याला ऑक्सिजन पाहिजे, इंजेक्शन हवेत, व्हेंटिलेटर्स हवे आहेत. आपल्याला साधरणपणे सुरूवातीस केंद्राने दर दिवशी २६ हजार ७०० च्या आसपास हे इंजेक्शन मिळतील अशी व्यवस्था केली होती. आपली मागणी ५० हजारांची आहे. त्यानंतर मी पंतप्रधानांना विनंती केली आणि त्यांनी ती मान्य केली.

यानंतर ४३ हजार दर दिवशी अशी आपल्यासाठी सोय करण्यात आली. आज साधरणपणे ३५ हजारांच्या आसपास ही रोजची इंजेक्शन आपल्याला मिळत आहेत. त्याचे देखील आपण पैसे देऊन हे इंजेक्शन घेतो आहोत. मात्र ही इंजेक्शन पुरवत असताना, एक गोष्ट मी राज्यातील सर्व कोविड केअर सेंटर व रूग्णालायांमधील कार्यरत डॉक्टर्स आहेत. त्यांना मी सांगतोय, याचबरोबर रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना सांगतो आहे की, नीट लक्षात घ्या डब्यूएचओ व आपल्या टास्क फोर्स, केंद्रातील तज्ज्ञ डॉक्टरांनी देखील एक सावधानतेचा इशारा दिलेला आहे. तो म्हणजे रेमडेसिविरचा अनावश्यक,अनाठायी वापर करू नका.

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeE

You May Also Like

error: Content is protected !!