अखेर केतकी चितळेला जामीन मंजूर

ठाणे : छोट्या पडद्यावरील मराठी अभिनेत्री केतकी चितळेने तिच्या फेसबुक खात्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट केली होती. १४ मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याच्या तक्रारीच्या आधारे कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करुन घेतल्यानंतर केतकीला १५ मे रोजी अटक करण्यात आली होती. ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या युनिट एकने केतकीला नवी मुंबईतील कळंबोली येथून अटक केली होती.त्यानंतर केतकीचे न्यायालयीन कोठडीत रवानगी केल्यानंतर या प्रकरणात जामीन मिळविण्यासाठी वकिलांमार्फत ठाणे न्यायालयात अर्ज केला होता. न्यायालयीन कोठडीत रवानगी केल्यानंतर केतकीने या प्रकरणात जामीन मिळविण्यासाठी वकिलांमार्फत ठाणे न्यायालयात अर्ज केला होता. अखेर महिन्याभरानंतर ठाणे न्यायालयाने तिला याप्रकरणात जामीन मंजूर केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या मराठी अभिनेत्री केतकी चितळेला जामीन मंजूर झाला आहे. ठाणे कोर्टाने केतळी चितळेला जामीन मंजूर केला आहे. महिन्याभरापासून केतकी कारागृहात होती.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपला जॉईन व्हा…

https://chat.whatsapp.com/GdbPgC62cnKHS4YUh0x6LE

You May Also Like