करोनाला हरविण्यासाठी बीसीसीआयचा मदतीचा हात

विराट कोहलीच्या संघाकडून 45 कोटींचा हातभार
मुंबई : करोना व्हायरसच्या दुसर्‍या लाटेमुळे देशातील आरोग्य यंत्रणेवर ताण पडला आहे. कुठे ऑक्सिजनची कमतरता, रेमडेसीवीर इंजेक्शनचा तुटवडा अशी विविध अडचणींना तोंड द्यावे लागतेयं. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी करोनाशी आरोग्य विभाग दिवसरात्र लढा देत आहेत आणि बीसीसीआय त्यांच्या कामाला सलाम करते. बीसीसीआयनंही नेहमी आरोग्य व सुरक्षेला प्राधान्य दिले आहे. या ऑक्सिजन संच या फ्रंटलाईन वर्कर्सना मदतच मिळेल आणि लोकं लवकरात लवकर बरी होतील.

करोनाशी आपण खांद्याला खांदा लावून लढायला हवं. देशातील आरोग्य यंत्रणेला या वैद्यकिय उपकरणांची गरज आहे आणि बीसीसीआयला याची जाण आहे, म्हणूनच आम्ही हा निर्णय घेतला आहे. आशा करतो की त्यातून यांना मदतच मिळेल, असे सचिव जय शाह यांनी सांगितले.

दरम्यान, आरसीबीची पॅरेंट कंपनी डिआयगो यांनीही या लढ्यात 45 कोटींच्या मदतीची घोषणा केली. प्रत्येक राज्यातील व केंद्रशासित प्रदेशातील एका जिल्ह्यात आरोग्य सुविधा उभारण्यासाठी हा निधी वापरला जाणार आहे.

You May Also Like