बेन स्टोक्सने मानसिक आरोग्यामुळे अनिश्चित काळासाठी घेतला ब्रेक

नवी दिल्ली ।  इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्सने मानसिक आरोग्यामुळे अनिश्चित काळासाठी  ब्रेक घेतला आहे.  या परिस्थितीत भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतही खेळणार नाही. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने आपल्या ट्विटर हँडल आणि वेबसाइटवर स्टोक्सविषयी माहिती दिली.   ”आम्ही स्टोक्सच्या निर्णयाचा आदर करतो आणि आम्ही त्याला आवश्यक वेळ देऊ. आम्ही त्याला इंग्लंडकडून परत खेळताना पाहण्यास उत्सुक आहोत.” अशा विविध प्रतिक्रिया स्टोक्सच्या या निर्णयानंतर येत आहे.

 

 

सोमरसेटचा क्रेग ओव्हरटन बेन स्टोक्सची जागा घेण्याची शक्यता आहे.  बेन आणि त्याच्या कुटुंबाला या काळात गोपनीयता देण्यात यावी, अशी ईसीबीने सर्वांना विनंती केली आहे. चार ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत बेन स्टोक्सव्यतिरिक्त जलदगती गोलंदाज ख्रिस वोक्स आणि जोफ्रा आर्चर देखील खेळणार नाही.

You May Also Like

error: Content is protected !!