बेंडाळे महाविद्यालयातील विद्यार्थिनींचा फीस गोंधळ अभिजित रंधे यांनी केले दूर

जळगाव : जि. डी. बेंडाळे महाविद्यालयातील काही विद्यार्थिनीं ने मासू चे विभाग प्रमुख ऍड अभिजित रंधे यांना संपर्क करून त्यांच्या फीस संदर्भातील अडचणी सांगितल्या होत्या.
तेव्हा मसू चे विभाग प्रमुख ऍड.अभिजीत रंधे व इतर सहकारी यांनी महाविद्यालयात जाऊन भेट दिली व बेंडाळे महाविद्यालयाच्या ऑफिस मध्ये बेंडाळे मॅडम व सोनवणे सर यांच्याशी भेटून नेमकी अडचण काय आहे व ती कशी सोडवता येईल यावर चर्चा करून विद्यार्थिनींचा फीस संदर्भात झालेला गोंधळ सोडवला।।
तसेच चर्चा करताना ऍड.अभिजीत म्हणाले की कोविडं 19 च्या या महा-मारीत सर्व सामान्य परिवाराला एक टप्यात इतकी फीस भरणे शक्य नाही प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती खालावली आहे.आणि अद्यापही बऱ्याच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळालेली नाही मग विद्यार्थी फीस भरणार तरी कशी,
चर्चा करताना मासू चे खानदेश प्रमुख ऍड.अभिजीत रंधे,खानदेश सचिव चेतन चौधरी,तसेच मासू सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे हर्षवर्धन खैणार व त्यांचे सहकारी उपस्थित होते.

You May Also Like