भांडुप : संतापलेल्या पतीने साडीने पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची घटना

भांडुप : कामावरून उशिरा घरी येतो तसेच विवाहबाह्य संबंधाबाबत विचारणा केली म्हणून संतापलेल्या पतीने साडीने पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची घटना भांडुप येथे घडली. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.

भांडुपच्या राजारामवाडी येथे ही घटना घडली. आरोपी पती हा कामावरून रोज उशिरा घरी यायचा. तसेच त्याचे विवाहबाह्य संबंध असल्याची कुणकुण त्याच्या पत्नीला लागली होती. याबाबत तिने रविवारी पतीला विचारणा केली. यावरून दोघांमध्ये वाद झाला आणि संतापाच्या भरात पतीने साडीने पत्नीचा गळा आवळला. त्यातच विवाहितेचा मृत्यू झाला. याबाबत माहिती मिळताच भांडुप पोलिसांनी घटनास्थळी जाऊन आरोपी पतीला अटक केली.

You May Also Like