भारत बायोटेकची पुण्यात सप्टेंबरपासून लस निर्मिती?

पुणे । करोना लसीच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या भारत बायोटेकची करोना प्रतिबंधक लस निर्मिती सप्टेंबरपासून सुरू होत आहे. पुण्यातील मांजरी येथे करोना प्रतिबंधक लसीच्या उत्पादनासाठी भारत बायोटेक या कंपनीचे काम अंतिम टप्यात आले असल्याची माहिती मिळत आहे.

 

 

राज्य शासनाने भारत बायोटेक कंपनीला पुण्यातील मांजरी येथे जागा दिली आहे. ही कंपनी कोव्हॅक्सिन लसीचे उत्पादन करणार आहे. सध्या देशात अपेक्षित प्रमाणात करोना लसीचे डोस उपलब्ध होत नसल्याने नवीन निर्मितीकडे लक्ष लागले आहे. राज्य शासनाच्या सूचनेनुसार राज्य आणि जिल्हा प्रशासनाकडून कंपनीच्या व्यवस्थापनाबाबत लागणाऱ्या विविध विभागांच्या परवानग्या कंपनीला देण्यात आल्या आहेत. कागदोपत्री परवानग्यांचे काम पूर्ण झाले आहे. तसेच लस निर्मितीसाठी लागणारे वैज्ञानिक क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ उपलब्ध करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी स्पष्ट केले.

You May Also Like