भारतीय जनता पार्टीची बैठक वसंत स्मृती भाजपा कार्यालय येथे संपन्न झाली

जळगाव : भारतीय जनता पार्टीची बैठक वसंत स्मृती भाजपा कार्यालय येथे संपन्न झाली. या बैठकीस महाराष्ट्राचे नेते गिरीषभाऊ महाजन, जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश दामू भोळे (राजूमामा), प्रदेश उपाध्यक्ष स्मिताताई वाघ, अनुसूचित जमाती संपर्क प्रमुख अॅड.किशोरभाऊ काळकर, किसान मोर्चा उत्तर महाराष्ट्र संयोजक सुरेश भाऊ धनके, किसान मोर्चा नारायण भाऊ चौधरी यांनी बैठकीत मार्गदर्शन केले.
सदर बैठकीला स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त ‘बळीराजा मार्गदर्शन व सहाय्यता केंद्राची’ स्थापना करण्यात आली. आ.राजुमामा भोळे यांनी आपल्या मार्गदर्शनातून बोलतानां सांगितले की योजनेतून जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना आपल्या समस्या सोडविण्यासाठी आपल्या गावात एका फोनवर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता उपलब्ध होणार आहे. स्वर्गीय हरिभाऊ जावळे हे शेतकऱ्यासाठी चालते फिरते मदत केंद्रच होते. म्हणून त्यांना समर्पित अशी योजनेची सुरुवात करण्यात आली.
सदर बैठकीत प्रदेशाने दिलेल्या आगामी कार्यक्रम जिल्ह्यात राबवावे अशी माहितीही जिल्हाध्यक्षांनी दिली. आंतरराष्ट्रीय योग दिन व आणिबाणीचा काळा दिवस प्रत्येक मंडल स्तरावर कोरोनाचे नियम पाळून संपन्न करावा असे आवाहन जिल्हाध्यक्ष आ.राजुमामा भोळे यांनी केले. सदर बैठकीस अनुसूचित जमाती प्रदेश संपर्क प्रमुख अॅड.किशोरभाऊ काळकर यांनी कोरोना काळानंतरच्या आजच्या प्रत्यक्ष बैठकीला मार्गदर्शन करतांना आगामी काळातल्या निवडणुका लक्षात घेऊन पक्षाची संघटनात्मक स्थिती मजबूत कशी होईल यावर मार्गदर्शन केले.
सदर बैठकीचा समारोप महाराष्ट्राचे नेते माजी मंत्री आमदार गिरीशभाऊ महाजन यांनी आपल्या समारोपीय भाषणात सांगितले की, कोरोनाच्या या महामारी मध्ये फक्त भारतीय जनता पार्टीचेच पदाधिकारी कार्यकर्ते हे जनतेच्या सेवेसाठी रस्त्यावर उतरून काम करत होते व आगामी काळातले पक्षाचे कार्यक्रम हे बूथ स्तरापर्यंत राबवावे. भाऊ स्वतः मंडळाच्या कार्यक्रमांना उपस्थिती देणार आहेत असे म्हणाले. येणाऱ्या काळात जळगाव जिल्ह्यात सर्व नगरपालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत ह्या साठी बूथ स्तरापर्यंत व जिल्ह्यातल्या प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत ‘बळीराजा मार्गदर्शन व सहाय्यता केंद्र’ प्रकल्पा मार्फत शेतकर्यांपर्यंत पोहचवायचे आहेत. आगामी जिल्हापरिषद हि भाजपा स्वबळावर जिंकू याचा संकल्प व निर्धार कार्यकर्त्यांच्या समवेत केला.
सदर बैठकीचे सूत्र संचलन के.बी.साळुंखे यांनी व प्रस्तावना मधुभाऊ काटे यांनी केले. व संघटनात्मक आढावा श्री.सचिन पानपाटील यांनी घेतला व आभार संतोष खोरखेडे यांनी मानले. बैठकीत जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी, सर्व जिल्हा आघाड्यांचे अध्यक्ष व मोर्चाचे जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, सरचिटणीस पूर्ण वेळ उपस्थित होते.

You May Also Like