भवानी देवीनं पराभवानंतर मागितली देशाची माफी

नवी दिल्ली तलवारबाज सीए भवानी देवी हिचा दि. 26 जुलै टोकियो ऑलिम्पिकमध्ये  दुसऱ्या सामन्यात पराभव झाला. यानंतर तिने एक ट्विट करून देशवासीयांची माफी मागितली. यावर तिचे हे ट्विट रिट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिला धीर देत तिचे कौतुक केले आहे.

 

“आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा होता. प्रचंड उत्साह आणि भावनांनी भरलेला होता. मी पहिल्या सामन्यात नादिया अझिझिला 15/3 ने पराभूत केले आणि ऑलिम्पिकमध्ये तलवारबाजीचा सामना जिंकणारी पहिली महिला ठरले. पण, दुसऱ्या सामन्यात जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या मनॉन ब्रुनेटकडून माझा 7/15 अशा फरकाने पराभव झाला. मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न केले. पण जिंकू शकले नाही. मला क्षमा करा,” असे ट्विट भवानी देवीने केले होते.

 

तुझ्या योगदानाचा अभिमान –
पंतप्रधान मोदींनी भवानीदेवीचे हेच ट्विट रिट्विट करत, “तू सर्वोत्तकृष्ट प्रयत्न केलेस आणि त्यालाच सर्वात जास्त महत्त्व आहे. विजय आणि पराभव हा जीवनाचा भाग आहे. भारताला तुझ्या योगदानाचा अभिमान आहे. देशवासीयांसाठी तू एक प्रेरणास्रोत आहेस,” असे म्हटले आहे.

 

 

You May Also Like