बीएचआर जळगाव जिल्ह्याच्या दृष्टीने खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली

जळगाव : बीएचआर घोटाळ्यात आज सकाळीच जळगाव जिल्ह्याच्या दृष्टीने खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगाव जिल्ह्यातून सात संशयित आरोपींना अटक केली आहे. दरम्यान, अटक केलेल्या व्यक्तींमध्ये भागवत भंगाळे यांच्यासह अनेक बड्या व्यक्तींचा समावेश आहे.

बीएचआर घोटाळा मागील काही दिवसापासून संपूर्ण राज्यात गाजत आहे. पुण्यात दाखल असलेल्या तीन गुन्ह्यांमध्ये अटक असलेल्या आरोपींचे जामीन होत असतानाच दुसरीकडे आज पहाटे मात्र, जळगाव जिल्ह्यात आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटकसत्र राबविले. यात भागवत भंगाळे (जळगाव) छगन झाल्टे (जामनेर), जितेंद्र रमेश पाटील जामनेर यांना औरंगाबाद येथून ताब्यात घेण्यात आले. आसिफ मुन्ना तेली (भुसावळ, जयश्री मणियार (जळगाव), संजय तोतला (जळगाव), राजेश लोढा (जामनेर) अशा अटक केलेल्या व्यक्तींची नावं आहेत.

या सर्व आरोपींना जिल्हापेठ पोलिस ठाण्यातून वैद्यकीय चाचणीसाठी जिल्हा रुग्णालयात नेले जाईल आणि त्यानंतर हे पथक लागलीच पुण्याकडे रवाना होणार असल्याचे कळते.

You May Also Like