बीएचआर घोटाळा : पोलीस कोठडीत असलेल्या ११ संशयित आरोपीं

जळगाव : बीएचआर घोटाळ्यात पोलीस कोठडीत असलेल्या ११ संशयित आरोपींपैकी एकानेही संपूर्ण घोटाळ्याची माहिती पोलिसांना दिली नाही. त्यामुळे अटक आरोपींची पोलीस कोठडी वाढवून मिळण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयात तब्बल २१ महत्वपूर्ण कारणे दिली होती. या कारणांमधून गुन्ह्याची व्याप्ती वाढल्याचे लक्षात येत असून अनेक जण चौकशीच्या फेऱ्यात अडकणार असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहेत.

आर्थिक गुन्हे शाखेने आरोपींची पोलीस कोठडी वाढवून मिळण्यासाठी दिलेली २१ कारणे

१. अटक आरोपी प्रेम रामनारायण कोगटा यांनी गुन्हयाचे झाले तपासात बीएचआरचे ठेवीदार त्यांच्याकडे ठेवी घेवुन येत असलेबाबत सांगतात. परंतु त्यांना एकाही ठेवीदारांचे नाव सांगता येत नाही. तसेच ठेवी आपल्या कर्जात वर्ग करणेकामी त्यांना मदत करणारे बीएचआर पतसंस्थेतील कर्मचारी तसेच स्टॅम्प आणणारे व बनावट कागदपत्रे तयार करणा-या एजंटची नावे सांगत नाहीत. याबाबत आरोपीकडे तपास करणे आहे.

२. अटक आरोपी जयश्री अंतिम तोतला यांना कर्जाबाबत काहीच माहिती नसुन त्यांचे पती अंतिम तोतला यांनी सर्व व्यवहार केल्याचे सांगुन उडवाउडवीची उत्तरे देत आहे. त्यांचे पती अंतिम तोतला यांच्याकडे पुढील चौकशी करणे आहे.

३. अटक आरोपी अंबादास आबाजी मानकापे हे गुन्हयाचे तपासात बीएचआर पतसंस्थेकडुन घेतलेले कर्ज ठेवीदारांच्या ठेवी मॅच करुन कर्ज खाते निरंक केले बाबत सांगत असुन यासाठी बनावट कागदपत्रे तयार करण्यासाठी स्टॅम्प कोणी आणले तसेच प्रतिज्ञापत्र कोठे तयार केले याबाबत काहीएक माहिती सांगत नसुन याबाबत आरोपीकडे तपास करणे आहे.

४. अटक आरोपी भागवत गंणपत भंगाळे यांचेकडे चौकशी करता आरोपी हा इसम नामे अशोक सेन याने कागदपत्रे तयार करणेकामी मदत केल्याचे सांगुन त्याबाबत अधिक काहीएक माहिती सांगत नाही. तसेच इतर एजंटची नावे सांगत नसुन याबाबत आरोपीकडे तपास करणे आहे.

५. अटक आरोपी छगन शामराव झाल्टे याने तपासात बीएचआर पतसंस्थेतील एका कर्जाबाबत माहिती सांगुन दुस-या कर्जाबाबत काहीएक माहिती सांगत नाही. तसेच ठेवी मॅच करणेकामी मदत केलेल्या एजंटची माहिती सांगत नाहीत याबाबत आरोपीकडे तपास करणे आहे.

You May Also Like