भुजबळांची 100 कोटींची मालमत्ता आयकर विभागाकडून जप्त, किरीट सोमय्यांंचा दावा

मुंबई । राष्ट्रवादीचे नेते आणि ठाकरे सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांची 100 कोटी रुपयांची संपत्ती आयकर विभागाने जप्त केली आहे, असा दावा भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. आज ट्विट करत त्यांनी आयकर विभागाकडून भुजबळांची १०० कोटी रुपयांची संपत्ती जप्त झाल्याचा दावा केला आहे.
एकीकडे राणेंवर अटकेची कारवाई झाल्यानंतर दुसरीकडे महाविकास आघाडीतील मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांना आयकर विभागाने दणका दिला. छगन भुजबळांची १०० कोटींची बेहिशोबी मालमत्ता जप्त केले गेली. छगन भुजबळ , माजी खासदार समीर भुजबळ आणि माजी आमदार पंकज भुजबळ यांची ही संपत्ती असल्याचीमाहिती भाजप नेते किरीट सोमय्यांनी ट्विट करुन दिली.

You May Also Like