भुसावळ : सिंधी काॅलनीतील रहिवासी हर्षलीन हीच्या आत्महत्येस नारायण अशाेककुमार हा जबाबदार

भुसावळ येथील सिंधी काॅलनीतील रहिवासी हर्षलीन हीच्या आत्महत्येस नारायण अशाेककुमार ठारवानी हा जबाबदार असल्याचा आराेप करीत त्याच्या विरूध्द मृत हर्षलीनच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून बाजारपेठ पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित हा झिराे पाेलिस म्हणून काम करीत असल्याची चर्चा आहे.

शहरातील सिंधी काॅलनीतील रहिवासी हर्षलीन हीचे नारायण साेबत प्रेमसंबंध हाेते. मात्र हर्षलिन हीने त्याच्या साेबत लग्नाला नकार दिल्याने ताे हर्षलिनला त्रास देत हाेता. हर्षलिनच्या माेबाईलवर धमकीचे संदेश देत हाेता. या सर्व प्रकाराला कंटाळून हर्षलिन हीने ८ मे ला राहत्या घरात ओढणी छताला बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. नारायण हा धमकी देऊन त्रास देत हाेता, अशी माहिती मृत्यू पूर्वी हर्षलिनने तिच्या आईला दिली हाेती. मी विवाहास नकार दिल्याने ताे त्रास देताे, असे तिने आईला सांगत त्याचे सिंधी काॅलनीत अन्य मुलीशी प्रेम असल्याचे हर्षलिनने तिच्या आईला सांगितले. त्यामुळे मी त्याच्याशी विवाह करीत नाही. आई-वडीलांची यामुळे बदनामी हाेईल असे ती म्हणत हाेती. यामुळे तिने आत्महत्या केली. याप्रकणी आकस्मात मृत्यूची नाेंद केली आहे. तसेच शनिवारी नारायण ठानवाणी याच्याविरूध्द मृत्यूस कारणीभूत म्हणून कलम ३०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहायक पाेलिस निरीक्षक अनिल माेरे, समाधान पाटील पुढील तपास करीत आहे.

नारायणची अरेरावी

पाेलिसांसाेबत राहत असल्याने नारायण याने लाॅकडाऊनच्या काळात पालिका व पोलीस यांच्या पथकाकडून दुकाने बंद केली जात हाेती. तसेच त्यावेळी पालिका कर्मचाऱ्याशी वाद घातले हाेते, त्याचा व्हिडिओ देखील शहरात व्हायरल झाला होता. त्याचवेळी त्याच्या विरूध्द सरकारी कामात अडथळा म्हणून गुन्हा दाखल हाेणार हाेता, मात्र काही जणांच्या मध्यस्थीने गुन्हा दाखल झाला नाही. मात्र आता थेट मृत्यूस कारणीभूत असा गुन्हा मंजू साेढाइ यांच्या फिर्यादीवरून दाखल झाला आहे.

You May Also Like