13 हजार कैद्यांच्या बाबतीत मोठा निर्णय; करोनामुळे जामिनावर सुटलेल्या कैद्यांना दिलासा

मुंबई । करोनामुळे राज्यभरातील  विविध कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या  13 हजार कैद्यांना तात्पुरता जामिन मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे शासनाकडून जोपर्यंत करोना नियमावलीत शिथिलता आणली जात नाही, तोपर्यंत तात्पुरत्या जामिनावर सोडण्यात आलेल्या कैद्यांना पुन्हा बोलाविले जाणार नसल्याची भूमिका कारागृह प्रशासनाने घेतली आहे. त्यामुळे कैद्यांना दिलासा मिळाला आहे.

 

करोनाच्या संसर्गामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील बहुतांश कारागृहातून 13 हजारहुन अधिक  कैद्यांना तात्पुरता जामीन मंजूर करण्यात आला होता. मात्र, आता करोनाचे संकट कमी झाल्यामुळे संबंधित कैद्यांना कारागृहात बोलविण्यासंदर्भात प्रशासनाने भूमिका स्पष्ट केली आहे. कारागृहातील वाढते बंदी आणि गर्दीमुळे तात्पुरत्या जामीनावर बाहेर सोडण्यात आलेल्या कैद्यांना लगेच बोलावले जाणार नाही. त्यामुळे संबंधित वैâद्यांना दिलासा मिळाला आहे.

 

 

३ हजार ६६० अधिकारी कर्मचारी 

करोनाचा प्रादुर्भाव होउ नये यासाठी राज्यातील विविध कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या तब्बल 87 हजार जणांनी कोवीड टेस्ट करण्यात आली आहे. त्याशिवाय पहिल्या टप्प्यातील 23 हजार 424 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. त्यामध्ये 3 हजार 660 कर्मचारी अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

 

करोनाच्या वाढत्या प्रादुभार्वामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील विविध कारागृहातून 13 हजारांवर कैद्यांना तात्पुरता जामीन मंजूर करण्यात आला होता. दरम्यान, सद्यःस्थितीत कोरोनाचे प्रमाण कमी झाले असले तरी, शासनाकडून कोरोना नियमावलीचा आदेश आल्याशिवाय जामीनावर सुटलेल्या कैद्यांना कारागृहात माघारी बोलाविले जाणार नाही.
– सुनील रामानंद, अपर पोलीस महासंचालक व कारागृह निरीक्षक

 

You May Also Like