अनलॉक संदर्भात राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई । करोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. पण करोनाची तिसरी लाट येण्याची भीती वर्तवली जात आहे. त्यामुळे राज्यात कोणतेही निर्बंध शिथिल करण्यात येणार नाही. जे नियम सध्या लागून आहे ते तसेच राहणार आहे, असं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

करोनाच्या पार्श्वभुमीवर राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. राज्यमंत्रिडळाच्या या बैठकीत निर्बंध शिथिल करण्यावर चर्चा झाली. निर्बंध शिथिल केले जाईल अशी शक्यता होती, पण जैसे थेच परिस्थिती ठेवण्यावरच सरकारला कल पाहण्यास मिळाला आहे.

राज्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या देशाच्या तुलनेत कमी आहे. गेल्या 3 आठवड्यात रुग्ण संख्या स्थिर आहे. पण 10 जिल्ह्यांमध्ये 92 टक्के रुग्ण आहे. त्यामुळे लेव्हल 3 मध्ये अनेक जिल्हे आहे. त्यामुळे राज्यात निर्बंध शिथिल करण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही, असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. ज्या व्यापार्‍यांनी लशीचे दोन डोस घेतले आहे. त्यांनी दुकानं खुले ठेवण्याबाबत मागणी केली होती. त्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दोन दिवसांमध्ये निर्णय घेणार आहे, असंही राजेश टोपे यांनी सांगितलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 7 जलै रोजी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्यासोबत महत्वाची बैठक घेतली होती. त्यानंतर 9 जुलै रोजी राज्य आपत्कालिन विभागातील अधिकार्‍यांसोबतही बैठक घेतली होती. राज्यातील निर्बंध शिथिल करण्यासाठी या दोन बैठकांमध्ये महत्वाची चर्चा झाली होती. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य टास्क फोर्समधील तज्ञ डॉक्टर आणि वरीष्ठ अधिकार्‍यांशी चर्चा करून अहवाल मागितला होता.

You May Also Like