मोठी बातमी ! मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात गॅस गळती

अग्निशमन दलाच्या 4 गाड्या दाखल

मुंबई ।  मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात गॅस गळती झाल्याचं समोर येत आहे. या घटनेची माहिती मिळताच फायरबिग्रेडने घटनास्थळी धाव घेतली असून एलपीजी  गॅस लीक झाल्याचं सांगण्यात येत आहे.

 

 

दरम्यान, अग्निशमन दलाच्या 4 गाड्या आणि 3 वॉटर टँकर घटनास्थळी दाखल होत आहे. कस्तुरबा रुग्णालय हे चिंचपोकळी परिसरात आहे. LPG गॅस पाईपलाईन लीक झाली. त्यामुळे तातडीने रुग्णालयातील रुग्णांना बाहेर काढलं जात आहे. ही गॅसगळती तुलनेने मोठी नाही. सकाळी 11.30 च्या सुमारास गॅस गळती झाल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

You May Also Like