मोठी बातमी! राहुल द्रविड होणार टीम इंडियाचा कोच

मुंबई : भारतीय क्रिकेटमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. टीम इंडियाचा माजी कॅप्टन आणि द वॉल म्हणून प्रसिद्ध असणारा राहुल द्रविड लवकरच टीम इंडियाचा कोच होणार आहे. राहुल द्रविड सध्या बंगळुरुतील नॅशनल क्रिकेट अकादमीचा संचालक आहे. तो यापूर्वी टीम इंडियाच्या अंडर-19 टीमचा कोच होता. त्याच्या मार्गदर्शनाखाली भारताने अंडर-19 वर्ल्ड कप देखील जिंकला आहे.

राहुल द्रविड टीम इंडियाचा कोच होणार असला तरी तो विद्यमान कोच रवी शास्त्री यांची जागा घेणार नाही. टीम इंडिया जुलै महिन्यात श्रीलंकेचा दौरा करणार आहे. प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये मसंपूर्ण नवी टीम इंडियाफ श्रीलंकेला जाणार आहे. या टीमचा कॅप्टन अजूनही नक्की नाही. शिखर धवन, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार आणि श्रेयस अय्यर ही चार नाव कॅप्टनपदाच्या शर्यतीमध्ये आहेत. मात्र टीमचा कोच राहुल द्रविड असेल, असं बीसीसीआनं निश्चित केल्याची माहिती बीसीसीआयच्या सुत्रांच्या आधारे दिली आहे. श्रीलंका दौर्‍याच्या वेळी रवी शास्त्रीसह संपूर्ण कोचिंग स्टाफ हा इंग्लंडमध्ये असनार आहे.

You May Also Like