देवमाणूस मालिकेत आलाय मोठा ट्विस्ट; एसीपी दिव्या सिंग मध्ये दिसणार नाही

मुंबई: देवमाणूस मालिका सध्या वेगळ्याच वळणावर आली आहे. डॉक्टर अजित कुमार देव उर्फ देवीसिंग आता तुरुंगात आहे. एसीपी दिव्या सिंगने प्रयत्न करून त्याच्या विरोधात अनेक पुरावे मिळवले आहेत. परंतु त्याच्याही काही उपयोग होताना दिसत नाहीए.

एसीपी दिव्याने जीव तोडून मेहनत घेत पुरावे गोळा केले आहेत. तिच्या या प्रयत्नांना सरकारी वकील आर्या देशमुखची साथ मिळणार आहे. या दोघी मिळून देवीसिंगचा मुखवटा फाडत त्याचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणण्यात यशस्वी होणार का, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

एसीपी दिव्याने भर लग्नमंडपातून अजितला अटक करत, त्याला फरफटत पोलीस ठाण्याच्या दिशेने वरात काढली होती. दिव्याने अशा पद्धतीने अटक केल्याने अजित भलताच संतप्त झाला. झालेली नाचक्की आणि अपमान तो सहन करू शकत नाही. या अटकेनंतर झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी अजितच्या डोक्यात नवी समीकरण शिजू लागली आहेत. यासाठी तो डिम्पलची मदत घेतो आहे.

पण आता मालिकेत दिव्या सिंग आता दिसणार नाही. कारण दिव्याच्या जागी आता नवीन पोलिस अधिकारी मालिकेत दिसणार आहे. इन्स्पेक्टर शिंदे आता दिव्या सिंगच्या जागी या केसचा तपास करणार आहेत.
ङ्गदेवमाणूसफमालिकेतील दिव्या सिंग आहे तरी कोण? अ‍ॅड. आर्याची भूमिका अभिनेत्री सोनाली पाटील ही साकारत आहे. तर दिव्यासिंगच्या भूमिकेत नेहा खान आहे. ती आता मालिकेत दिसणार नसल्यानं चाहत्यानी नाराजी व्यक्त केली आहे.

 

You May Also Like