27 वर्षे संसार केल्या नंतर अब्जाधीश बिल गेट्स, मेलिंडाकडून घटस्फोटाची घोषणा

नवी दिल्ली :  अब्जाधीश आणि मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स आणि  मेलिंडा गेट्स यांनी २७ वर्षांचे नाते संपविण्याची घोषणा केली आहे.  बिल गेट्स आणि मेलिंडा गेट्स यांनी घटस्फोट घेत असल्याची घोषणा केली आहे. पुढील काळात आम्ही एकमेकांसोबत चालू शकत नाही, असे त्यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे.

बिल गेट्स आणि मेलिंडा यांचे लग्न 1994 मध्ये झाले होते. ते एकमेकांना 1987 मध्ये पहिल्यांदा भेटले होते. 27 वर्षे एकत्र राहिलेल्या या जोडप्याकडून नातेसंबंध तोडण्याची घोषणा झाल्याने लोकही हैरान झाले आहेत.

बिल गेट्स आणि मेलिंडा यांनी एक वक्तव्य जारी केले आहे. बिल गेट्स यांनी ते ट्विटरवर शेअर केले आहे. मोठी चर्चा आणि आपल्या नात्यावर काम केल्यानंतर आम्ही वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या 27 वर्षांमध्ये आम्ही आमच्या तीन मुलांचे संगोपन केले.

तसेच, आम्ही एक फाऊंडेशन देखील बनविले आहे. जे जगभरातील लोकांच्या आरोग्य आणि चांगल्या आयुष्यासाठी काम करते. आम्ही या मिशनसाठी पुढेही एकत्र काम करत राहणार आहोत. परंतू आता आम्हाला वाटत आहे की, पुढील काळात पती-पत्नी म्हणून आम्ही एकमेकांना साथ देऊ शकणार नाही. यामुळे आम्ही नवीन आयुष्य सुरु करणार आहोत. यामुळे लोकांकडून आम्हाला आमच्या आयुष्यात हस्तक्षेप न करण्याची अपेक्षा आहे. असेही त्यांने नमूद केलेय.

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeE

 

You May Also Like