नागपूर जिल्ह्यातील शिवसेनेला भाजपनं लावला सुरुंग लावला आहे

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील शिवसेनेला भाजपनं लावला सुरुंग लावला आहे. बुटीबोरी नगरपरिषदेतील शिवसेनेच्या दोन नगरसेविकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत या दोन नगरसेविकांनी भाजपात प्रवेश केला

विकासनिधी मिळत नसल्याने शिवसेनेवर नाराजी

विकासनिधी मिळत नसल्याने या नगरसेवकांची शिवसेनेवर नाराजी होती. तसेच, शिवसेनेचे आणखी काही कार्यकर्ते भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. बुटीबोरीचे नगराध्यक्ष बबलू गौतम यांच्या प्रयत्नामुळे शिवसेनेला सुरुंग लागला आहे. तर काँग्रेसच्याही काही कार्यकर्त्यांनी यावेळी भाजपमध्ये प्रवेश केला.

‘शिवसेनेला संपवल्याशिवाय राहणार नाही’

“राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची गेल्या निवडणूकीतंच छुपी युती होती, शिवसेनेनं पाठीत खंजीर खुपसलाय, आता आगामी निवडणूकीत सेना – राष्ट्रवादी एकत्र लढली तरिही काही परिणाम नाही, आम्ही निवडणूकीच्या राजकारणातून शिवसेनेसा संपवल्याशिवाय राहणार नाही” असं भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले होते. आगामी सर्व निवडणूका जिंकण्याचा विश्वासंही त्यांनी व्यक्त केला आहे.

नितीन गडकरी यांच्या हस्ते बुटीबोरी उडानपुलाचं लोकार्पण

नागपूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्ग सातवरील हिंगणघाट येथे नांदगाव चौरस्त्यावरील उड्डाणपुलाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर उड्डाणपूल लोकांसाठी खुला करण्यात आला. तब्बल 69 कोटी रुपये खर्च करुन हा सहा लेनचा उड्डाणपूल बनवण्यात आला आहे. बुटीबोरी महामार्गावर ट्राफीक जामपासून दिलासा मिळणार आहे.

You May Also Like