गावगुंडांना पोसण्याचे काम भाजपा करतेयं

शिवसेनेचे हिलाल माळी यांचा पत्रकार परिषदेत घणाघात
धुळे : राजकारणाच्या ठिकाणी राजकारण असले पाहिजे. शहरातील राजकारण्यांनी खालची पातळी गाठली आहे. महापौर चंद्रकांत सोनार व त्यांचा नगरसेवक पुत्र देवा सोनार यांनी ऑडीओ क्लिप सोशल व्हायरल करून माझ्यासह पक्षाची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपा चुकीच्या लोकांना पाठीशी घालते. गावगुंडांना पोसण्याचे काम भाजपा करत आहे. आम्ही संयम ठेऊन आहोत. असेच सुरू राहिले तर शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता शिवसेनेचे जिल्हा प्रमुख हिलाल माळी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शासकीय विश्रामगृहात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेनेने जिल्हा प्रमुख हिलाल माळी समवेत अ‍ॅड.पंकज गोरे, मनोज मोरे, संजय वाल्हे, बबन थोरात, संदीप चव्हाण, राजू पटवारी, शरद गोसावी, भटू गवळी, दिगंबर चौधरी आदि उपस्थित होते. यावेळी पुढे बोलतांना हिलाल माळी म्हणाले की, माझी बदनामी करणारी ऑडिओ क्लीप व्हायरल करण्यात आली आहे. भाजपाला नागरीकांनी एकहाती सत्ता दिली आहे, परंतू भाजपाला नागरीकांना मुलभूत सुविधा देण्यात अपयशी ठरली आहे. मनपात भूमिगत गटारीच्या कामात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराबाबत शिवसेनेने आवाज उठविला आहे. त्यासोबतच शहरातील स्वच्छतेचा प्रश्न, पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाबाबतची उदासिनदा, रस्ता कामांमध्ये भ्रष्टाचार या संदर्भात शिवसेनेने निवेदन देवून वेळोवळी सुचविले आहे. यावेळी रोहीत सानप व प्रविण मंडलिक यांच्या संभाषणाची क्लिप पत्रकारांना ऐकवली. छत्रपती शिवाजी मेडिकल,साक्री रोड ते महाकाली मंदिरापर्यंत केलेल्या भष्टाचाराबाबत शिवसेनेचे मनोज मोरे यांनी देखील त्यावेळी केले होते. शिवसेनेने त्यावेळीही रस्त्यावर उतरून पत्रकार परिषद घेतली होती.

गरताड गावाजवळ जनावरांची अवैध वाहतूक करणारे वाहन पकडण्यात आले होते. वाहन चालकांकडून हिलाल माळी यांचे नाव सांगण्यात येत असल्याचे बनावट क्लिप तयार करून व्हायरल करण्यात आली. हिलाल माळी गाईंचे वाहन सोडून देण्यासंदर्भात हप्ते घेतात अशा आशयाची क्लिप पसरविण्यात आली. या आधीही आपल्या वाहनावर प्राणघातक हल्ला चढविण्यात आला होता. माजी आमदार अनिल गोटे यांनी देखील चारित्र्यावर शिंतोडे उडवले. आपल्यावर कितीही हल्ले झाले तरी डगमगणार नाही.

तरूणांना आवाहन
शहरातील तरूणांनी शांतता व सुव्यवस्था अबाधित राहील यासाठी कार्य करावे, घाणेरड्या राजकारणाला बळी पडू नये. तरूणांनी आपले भविष्य धोक्यात न घालता. स्वत:चा वापर होऊ देवू नका.
हिलाल माळी
जिल्हा प्रमुख, शिवसेना

You May Also Like