भाजपा नेत्या पंकजा मुंडे करोना पॉझिटीव्ह

बीड :  भाजपा नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन त्यांनी यासंदर्भात माहिती दिली. गेल्या 4 ते 5 दिवसांपासून त्यांनी स्वत:ला क्वारंटाईन करुन घेतलं होतं. आज, त्याचा कोरोनाचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याची माहिती त्यांनी दिली.

करोना संसर्ग झालेल्या अनेक रुग्णांच्या कुटुंबीयांची भेट घेतली असल्याने आपल्यालाही लागण झाली असल्याची शक्यता पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली आहे. पंकजा मुंडे यांनी यावेळी आपल्या संपर्कात आलेल्यांना चाचणी करण्याचं आवाहन केलं आहे.

कजा मुंडे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली. मी आधीच काळजी घेत असून विलगीकरणात आहे. मी अनेक लोकांना तसंच करोना रुग्णांच्या कुटुंबीयांची भेट घेतली असून त्याद्वारे संसर्ग झाला असावा. माझ्यासोबत जे होते त्यांनीदेखील चाचणी करुन घ्या..काळजी घ्या”.

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeE

You May Also Like