भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका

मुंबई : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. यानंतर आता आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली असून, गाडीवर दगडफेक झाल्याच्या कृतीवर भाजपनेही आक्रमक पवित्रा घेतला आहे. तुम्ही तरी एकच काच फोडली आम्ही एक सुद्धा शिल्लक ठेवणार नाही, असा थेट इशारा भाजपकडून देण्यात आला आहे.

भाजप आमदार गोपीचंद पडळकर गेल्या अनेक दिवसांपासून शरद पवार, अजित पवार यांच्यावर सातत्याने टीका करताना पाहायला मिळत आहे. मात्र, बुधवारी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. ओबीसी आरक्षण जनजागृती दौऱ्यावेळी घोंगडी बैठकीसाठी पडळकर सोलापुरात आले होते. त्यावेळी गोपीचंद पडळकर ताफ्यावर दगडफेड झाल्याची घटना घडली. यानंतर भाजप नेते निलेश राणे यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना थेट इशारा दिला आहे.

फुटलेल्या काचा मोजण्यात पुढची पाच वर्षे जातील

आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीची एक काच फोडून जर कोणाला वाटत असेल की आम्ही मोठा पराक्रम केला तर एवढं समजून चला जेव्हा तुमच्या हातातली सत्ता जाईल तेव्हा फुटलेल्या काचा मोजण्यात पुढची पाच वर्षे जातील, हे लक्षात असू दे. तुम्ही तरी एकच काच फोडली आम्ही एक सुद्धा शिल्लक ठेवणार नाही, असा इशारा निलेश राणे यांनी दिला आहे.

You May Also Like