धुळ्यात भाजपातर्फे शंखनाद; राम मंदिराबाहेर केले आंदोलन

धुळे ।  शहरातील फुलवाला चौकातील राम मंदिराबाहेर भाजपतर्फे मंदिर खुली करण्यासाठी शंखनाद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनातून भाजपने राज्य सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्‍न करत मंदिर खुले करण्याची मागणी केली.  करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व मंदिर राज्य सरकारतर्फे बंद ठेवण्यात आले आहेत. याचा विरोध करीत भाजपतर्फे आज धुळ्यातील राम मंदिराबाहेर शंखनाद आंदोलन करून राज्य सरकारला जागे करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

 

 

दरम्यान, एकीकडे बाजारपेठा त्याचबरोबर सर्व उद्योग व्यवसाय सुरू करण्यात आले आहेत. तसेच दारूची दुकाने, बियर बार, हॉटेल हे देखील उघडण्यात आले. दुसरीकडे मात्र मंदिर उघडण्यास अद्यापही प्रशासनातर्फे सकारात्मक भूमिका घेतली जात नसल्याचा आरोप भाजपतर्फे लावण्यात आला आहे. तर राज्य सरकारच्या या भूमिकेचा विरोधामध्ये व सरकारला जागे करण्यासाठी मंदिरे उघडण्यासाठी ईश्वरातर्फे महाविकास आघाडी सरकारला सद्‌बुद्धी येवो यासाठी धुळ्यामध्ये शंखनाद आंदोलन भाजपतर्फे करण्यात आले आहे. या शंखनाद आंदोलनादरम्यान भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You May Also Like