ब्लॅक फंगसवरील औषधाचाही काळाबाजार?

नवी दिल्ली : करोना संसर्गावरील उपचारात वापरल्या जाणार्‍या रेमडेसिवीर व अन्य औषधांच्या काळ्या बाजारीपाठोपाठ ब्लॅक फंगस रोगावरील औषधाचाही काळाबाजार सुरू झाला आहे. करोना संसर्ग होऊन गेलेल्या लोकांना प्रामुख्याने ब्लॅक फंगस म्हणजे म्युकर मायकोसिसचा सामना करावा लागत आहे. ब्लॅक फंगसवरील उपचारात कामी येणारे अम्फोटेरीसीन-बी नावाचे इंजेक्शन बाजारातून गायब झाले असून काळ्या बाजारात मात्र ते चढ्या दराने मिळत आहे.

देशाच्या विविध भागात ब्लॅक फंगस रोगाचे प्रमाण वाढत आहे. एकीकडे रेमडेसिविर इंजेक्शन आणि ऑक्सीजनचा ठणठणाट असताना दुसरीकडे ब्लॅक फंगसवरील औषधे गायब होत चालली आहेत. रुग्णांच्या संकटात यामुळे जास्तच भर पडली आहे. देशाची राजधानी दिल्लीतील एम्स, लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज तसेच सर गंगाराम रुग्णालयात एकूण शंभरावर रुग्णांवर म्युकर मायकोसिसवर उपचार सुरू आहेत. यातील अनेक रुग्णांना आवश्यक ती औषधे मिळण्यात अडथळे येत आहेत.

You May Also Like

error: Content is protected !!