बॉडीबिल्डर जगदीश लाड याचे करोनामुळे निधन

मुंबई : करोनाच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण  देशात हाहाकार माजवला आहे. दरदिवशी वाढणारी रुग्ण संख्या आणि मृतांची संख्या हि भयावह आहे. तरीही अजूनही काही लोक हि बाब गांभीर्याने घेत  नाहीयेत. अनेकजण आपण एकदम ठणठणीत असून करोना होणार नाही अशा गैरसमजात आहेत.  परंतु बॉडी बिल्डिंगमधील सर्व सर्वोच्च खिताब जिंकणारा मराठमोळा बॉडीबिल्डर जगदीश लाड याचे करोनामुळे  निधन झाले आहे. तो ३४ वर्षांचा होता. बडोद्यात त्याने अखेरचा श्वास घेतला.

मूळचा सांगली जिल्ह्यातील कुंडल गावचा असणारा जगदीश लाड हा नवी मुंबईत राहायचा. नंतर तो वडोदरा येथे स्थायिक झाला होता. तिथे त्याने स्वत:ची व्यायामशाळा सुरु केली होती. जगदीश लाडने नवी मुंबई महापौर श्रीचा किताब जिंकला होता. महाराष्ट्र श्रीमध्ये त्याला गोल्ड मेडल मिळालं होतं. मिस्टर इंडिया स्पर्धेतही जगदीश लाडने आपली छाप पाडत दोन वेळा गोल्ड मेडल जिंकलं होतं. दरम्यान वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये त्याने कांस्य पदक मिळवलं होतं.

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeE

You May Also Like

error: Content is protected !!