बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर-खान नेहमीच चाहत्यांच्या मनावर राज्य करते

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर-खान नेहमीच चाहत्यांच्या मनावर राज्य करते. करीना तिच्या सौंदर्याबरोबरच तिच्या बिनधास्त अभिनयासाठीही ओळखली जाते. या अभिनेत्रीने आतापर्यंत तिच्या कारकीर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट केले असून, तिला चाहत्यांकडून नेहमीच कौतुकाची थाप मिळाली आहे. करीनाचे चित्रपट पडद्यावर बक्कळ कमाई करतात. याच कारणामुळे अभिनेत्रीची कमाई आणि मालमत्ता ती सैफपेक्षा अजिबात कमी नाही

‘रेफ्यूजी’ या चित्रपटाने करिअरची सुरुवात करणारी करीना आजच्या घडीला चित्रपटांसाठी भरमसाठ मानधन आकारते. करीना बॉलिवूडमधील महागड्या अभिनेत्रींपैकी एक आहे. एकट्या करीनाकडे 413 कोटींची संपत्ती आहे. यामध्ये पती सैफ अली खानच्या मालमत्तेचा समावेश नाही.

करीना कपूरचे नेट वर्थ

2014पर्यंत करीनाकडे 74.47 कोटींची संपत्ती होती. करीना चित्रपट, ब्रँड अँडर्समेंट्स, स्टेज शो, टूर्स आणि रेडिओ शो इत्यादी माध्यमातून पैसे कमवते. सध्या करीना कपूरचे नेटवर्थ सुमारे 413 कोटी रुपये आहे. तर, अभिनेत्री वर्षाकाठी अंदाजे 73 कोटी रुपये कमावते.

करीना कपूर खानचे बंगले आणि गाड्या

अभिनेत्री करीना कपूरकडे स्वत:च्या कमाईचे लक्झरी बंगले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, वांद्रे येथील फॉर्च्यून हाईट्समध्ये या अभिनेत्रीचा 4BHK अपार्टमेंट आहे. इतकेच नाही तर, तिचे स्वित्झर्लंडच्या Gstaa येथेही घर असल्याचे म्हटले जाते.

करीना कपूर यांना वाहनांची प्रचंड आवड आहे आणि तिच्याकडे बर्‍याच गाड्या देखील आहेत. ज्यात मर्सिडीज बेंझ एस क्लास या गाडीचा समावेश आहे. या मर्सिडीज बेंझ एस-क्लासची किंमत सुमारे 1.40 कोटी रुपये आहे. तर, तिच्याकडे ऑडी क्यू 7 गाडी देखील आहे, जिची किंमत 93 लाख रुपये आहे. या शिवाय तिच्याकडे रेंज रोव्हर स्पोर्ट एसयूव्ही आणि लेक्सस एलएक्स 470 या जवळपास 2.32 कोटी रुपयांच्या गाड्या आहेत.

काही महिन्यांपूर्वी करीना कपूर पुन्हा एकदा आई बनली आहे. तिने पुन्हा एकदा मुलाला जन्म दिला आहे. मात्र, अभिनेत्रीने अद्याप आपल्या मुलाचे नाव जाहीर केलेले नाही. करीना शेवट ‘गुड न्यूज’ या चित्रपटात दिसली होती. आता ती आमीर खानसमवेत ‘लालसिंग चढ्ढा’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग सध्या सुरू आहे.

You May Also Like