बोराडी; जंगलातील गांजा पार्टीचा अड्डा केला उध्वस्त

शिरपूर ।  शिरपूर बोराडीजवळील जंगलात पिण्यासाठी जंगलात गांजेकसानी तयार केलेल्या झोपडीचे अतिक्रमण वनविभागाने उध्वस्त केले. 

 

 

बोराडी (ता.शिरपूर) घाटातील नांदर्डे रस्त्यालगत वनजमिनीच्या कूप नं.890 मध्ये बांबूची झोपडी तयार केलेली आढळली होती. प्राथमिक चौकशीत परिसरातील गांजेकसानी झोपडी बांधून अतिक्रमण केल्याचे निष्पन्न झाले. त्याबाबत सहायक वनसंरक्षक अमितराज जाधव यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी अतिक्रमण उखाडण्याचे आदेश दिले. वनक्षेत्रपाल आनंद मेश्राम,सांगवीच्या वनक्षेत्रपाल श्रीमती गंभरे यांच्या नेतृत्वाखाली वनपाल पी.एच.माळी, के.डी.गुजर, कपिल पाटील, विवेक सूर्यवंशी, बी.ए.महाले, वानखेडे आदींनी कारवाई करीत झोपडी जमीनदोस्त केली. कारवाईदरम्यान काहींनी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. मात्र कायदेशीर कारवाईची तंबी दिल्यानंतर संबंधितांनी काढता पाय घेतला. झोपडी जमीनदोस्त करण्यात आली असल्याने निसर्ग मित्रांकडून कौतुक केले जात आहे.

You May Also Like