बॉक्सर सतीश कुमारची धमाकेदार खेळी; पदकापासून एक पाऊल दूर

टोकियो ।  भारताच्या चार खेळाडूंनी पदकाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे. हॉकी, बॅडमिंटन, तीरंदाजीपाठोपाठ आता बॉक्सिंमध्येही भारताने बाजी मारली आहे. भारताचा स्टार बॉक्सर सतीश कुमारने 91 किलो वजनी गटाच्या शेवटच्या सामन्यात जमैकाच्या रिकार्डो ब्राउनचा 4-1 अशा फरकाने पराभव केला आहे.

 

 

सतीशने आजच्या विजयासह अंतिम 8 मध्ये प्रवेश केला आहे. पदकापासून सतीश केवळ एक पाऊल दूर आहे. सतीशने जमैकाच्या बॉक्सर विरोधात धमाकेदार खेळी करत क्वार्टर फायनलमध्ये स्थान पक्के केले. आपल्या दमदार पंचेसच्या जोरावर 5-0 अशा फरकाने पहिला राऊंड सतीशने आपल्या नावे केला. या राऊंडमध्ये पाचही पंचांनी सतीशला 10-10 अंक दिले.

 

You May Also Like