ब्रेकिंग! मंत्रालयासमोर तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई ।  मंत्रालयाच्या गेट समोर एका व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न  केल्याची माहिती नुकतीच समोर येत आहे. विष प्राशन करत या व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. मंत्रालयाच्या परिसरात उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी या व्यक्तीला तात्काळ ताब्यात घेत उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.

 

 

हा व्यक्ती कोण आहे, कुठून आला आहे तसेच त्याने आत्महत्येचा प्रयत्न का केला? या संदर्भात अद्याप माहिती मिळू शकलेली नाहीये. या व्यक्तीच्या संदर्भात पोलीस अधिक माहिती घेत आहेत. दरम्यान मंत्रालयाच्या गेटसमोर झालेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

You May Also Like