ब्रेकिंग न्युज! ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमार अटकेत

नवी दिल्ली : ऑलिम्पिक पदक विजेता पैलवान सुशील कुमारला अटक करण्यात आलीयं. माजी ज्युनियर नॅशनल चॅम्पियन सागर धनखडच्या मृत्यू प्रकरणात सहभागी असल्याचा आरोप सुशील कुमारवर आहे. सुशील कुमारवर एक लाखांचं बक्षीसही जाहीर करण्यात आलं होतं. सुशील कुमार परदेशात पसार झाला असावा असा संशय पोलिसांना होता.

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं ही कारवाई केली. सुशील आणि आरोपी अजयला दिल्लीतील मुंडका परिसरातून अटक करण्यात आल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक शिवकुमार, पोलीस निरीक्षक करमवीर आणि एसीपी अत्तर सिंह यांच्या नेतृत्त्वात स्पेशल सेलनं सुशील कुमार आणि अजयला दिल्लीतील मुंडका परिसरातून अटक केली.

मारहाणीचा व्हिडीओ पोलिसांच्या हाती
मारहाणीचा व्हिडीओही पोलिसांच्या हाती लागला आहे. ज्या दिवशी हत्या झाली, त्याच रात्री पोलिसांनी यामध्ये सहभागी असलेला एक आरोपी प्रिन्स दलालला अटक केली होती. त्याच्या चौकशीनंतर पोलिसांनी आणखी दहा आरोपींची ओळख पटवली होती. परंतु अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. तीन दिवसांपूर्वी पोलिसांनी या प्रकरणात सुशील कुमारचे सासरे आणि द्रोणाचर्च पुरस्कार विजेते सतपाल सिंह तसंच मेहुणार लव सहरावत यांची अनेक तास चौकशी केली होती. पोलिसांनी सुशील कुमारच्या सासर्‍यांकडे त्याच्या लपण्याच्या संभाव्य ठिकाणांबाबत विचारणा केली होती.

You May Also Like