नाशिकच्या लाचलुचपत विभागाने पकडला, दोंडाईचा पोलीस स्टेशनचा लाचखोर हवलदार….

अठरा हजाराची लाच घेतांना रंगेहाथ सापडला हवलदार विजय मोरे

दोंडाईचा : काल दिनांक २५ मे मंगळवार रोजी रात्री दहा वाजता दोंडाईचा पोलीस काँलनीतील रिकाम्या खाली पडलेल्या निवासस्थानी नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारदाराच्या फिर्यादीवरून सापडा रचत अठरा हजाराची लाच स्विकारताना दोंडाईचा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या हवलदार विजय शंकरराव मोरे (वय ५०) याला रंगेहाथ पकडले आहे.

याबाबत पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, रामी ता. शिंदखेडा, जि. धुळे येथील तक्रार धारक योगेश संतोष कोळी व त्याचे नातेवाईक विरूद्ध दोंडाईचा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात, सदर गुन्ह्याचे दोषारोप पत्र मा.न्यायालयात दाखल न करता सदर गुन्ह्यात ब वर्गात समरी पाठवण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे दि. २५ मे मंगळवार २०२१ रोजी २०,०००/- व रुपये तडजोडी अंती १८,०००/- रूपयेची लाचेची मागणी करून ती दि. २५ मे मंगळवार २०२१ रोजी दोंडाईचा पोलीस स्टेशनच्या पाठीमागील रिकामे खाली पडलेल्या निवासस्थानी स्विकारली. म्हणून तक्रार याच्या फिर्यादीवरून दोंडाईचा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावेळी सापळा यशस्वी करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे, पोलीस उप-अधीक्षक वाचक विभाग विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप-अधीक्षक नरेंद्र पवार, पोलीस निरीक्षक उज्वलकुमार पाटील, पोलीस हवलदार दिपक कुशारे, सचीन गोसावी, पोलीस नाईक एकनाथ बावीस्कर, प्रकाश डोंगरे, चालक पोलीस शिपाई जाधव आदींनी मेहनत घेतली.

You May Also Like

error: Content is protected !!